विधान भवनात आ. प्रकाश गजभिये यांनी अनोख्या पद्धतीने केली भिडे यांच्या अटकेची मागणी

04 Jul 2018 , 10:42:51 PM

भीमा-कोरेगावच्या दुर्दैवी घटनेनंतर त्याला कारणीभूत असलेले आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विविध घटकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र तात्पुरती मिलिंद एकबोटे यांची अटक करण्याचा दिखावा उभा करत, भिडे यांच्या अटकेबाबत सरकारकडून सोयीस्कर टाळाटाळ केली जात आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश गजभिये यांनी भिडेंच्या वेषात विधान भवनात येत भिडेंच्या अटकेची मागणी केली. यावेळी त्यांनी भिडे यांच्या आंबे खाऊन पुत्रप्राप्ती होते या अंधश्रद्धेचा पुरस्कार करणाऱ्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंब्याची पाटी हातात घेऊन ती उपस्थितांना दाखवली. भारतीय संविधानाला कुणीही कमी लेखू नये. देशाला संविधानिक अधिकार देणारी ती एक शक्ती आहे. असे वक्तव्य करतानाच भिडे यांनी अंधश्रद्धेचा प्रसार थांबवावा, असा इशाराही गजभिये यांनी दिला.

संबंधित लेख