शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, धनंजय मुंडेंची मागणी

10 Jul 2018 , 11:50:30 PM

बोंडअळीमुळे कापसाचे आणि तुडतुड्या रोगामुळे धानाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृह चालू असताना मंत्री बाहेर घोषणा कशा करतात, अशी विचारणा करतानाच शेतक-यांची फसवणूक करताना सरकारला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला आणि मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलल्याबाबत आणि फसवणूक केल्याबाबत सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. या विषयावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

संबंधित लेख