जळीत महिलांचेही वाढावे 'मनोधैर्य' - चित्रा वाघ

01 Feb 2016 , 07:53:55 PM

आघाडी सरकारच्या काळात बलात्कारपिडीत महीला व मुलींच्या पुनर्वसानासाठी बनवलेल्या 'मनोधैर्य' योजनेमधे जळीत महीलांचाही समावेश करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अर्थमंञी सुधीर मुनगंटीवार यांची आज  भेट घेतली. यावेळी नवी मुंबई अध्यक्षा माधुरी सुतार, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना हसनाळे, करिना दहीलयानी आदी उपस्थित होत्या.

मनोधैर्य योजनेअंतर्गत पिडीतेला उपचारासांठी तात्काळ ५०,००० रुपये तर खर्चासाठी अडीच लाख असे एकूण ३ लाख रुपयांची मदत केली जाते. आघाडी सरकारच्या काळात या योजनमधे अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या महिलांचा समावेश व्हावा अशी मागणी चित्राताईंनी तत्कालीन उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे केली होती. तसेच आता जळीत महिलांचाही या योजनेत समावेश करावा या मागणीसाठी मंञी सुधीर मुनंगुटीवार यांची आज चिञा वाघ यांनी भेट घेतली. यावेळी लवकरच जळीत महिलांचाही या योजनेत समावेश करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे. 

संबंधित लेख