आरक्षणासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी - आ. छगन भुजबळ

29 Jul 2018 , 12:20:34 AM

मराठा आरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चेसाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि आ. छगन भुजबळ उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे. यासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी, घटनेत तशी तरतूद करून घेण्यात यावी अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी केली. दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी आदरणीय पवार साहेब स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान आत्महत्या, हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर जर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि बदल गरजेचे असतील तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करू, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली.

संबंधित लेख