राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकसभा मतदारसंघांची चाचपणी

08 Oct 2018 , 09:50:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. सलग दोन दिवस चालणारी ही मॅरेथॉन बैठक आज ठाणे, कल्याण-डोंबिवली, ईशान्य मुंबई, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, माढा, यवतमाळ या भागांचा आढावा घेतल्यानंतर संपन्न झाली. यावेळी ज्या ठिकाणी राष्ट्रावदी काँग्रेस पार्टीची ताकद आहे त्या मतदारसंघांबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

या आढावा बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले की आम्ही कोणत्या जागा लढवणार यावर बोलण्यापेक्षा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शक्ती आहे, जिथे राष्ट्रावादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा जागांचा आढावा घेतला गेला. मुंबईत एक जागा वाढवून मिळावी अशी मागणी मुंबईतील कार्यकर्त्यांनी केली असल्याचेही ते म्हणाले. ज्या उमेदवारांना जनाधार आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, भाजप – शिवसेना युती सरकारचा पराभव करण्यासाठी सर्व गोष्टी करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

या बैठकींसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, खा. माजिद मेमन, खा. उदयनराजे भोसले, आ. छगन भुजबळ,  माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी खासदार संजय दिना पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खा. विजयसिंह मोहिते पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित आहेत.

संबंधित लेख