तब्बल अडीच वर्षांच्या काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी विधान सभेच्या कामकाजात सहभाग घेतला. सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.नाशिक येथून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते. त्यांचे पाय रक्ताळले होते. वनहक्काच्या जमिनीसाठी ते आंदोलन होते. न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना एक आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काही केले नाही, असा आरोप करत त्यांनी सरकारवर तोफ डागली. या सरकारने लोकांना फसवले आहे. ...
पुढे वाचाशुक्रवारी विधानसभेत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज क्रमात दाखवलेल्या लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हरकत घेत सभागृहाच्या कामकाजावर आपली नाराजी व्यक्त केली.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्या वेळी एखाद्या महत्वाच्या विषयासंदर्भात सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडली जाते. त्यावेळी त्या विषयावर संबधित विभागाच्या मंत्र्याकडून ठोस उत्तर मिळावे अशी सदस्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो सदस्यही त्या विषयासंदर् ...
पुढे वाचाउस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची रब्बी हंगाम २०१५ मधील पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर शासनस्तरावर सदर रब्बी पीक विम्याबाबत कृषी प्रधान सचिव श्री.बिजयकुमार व अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग डी.के.जैन यांच्याकडून दोन दिवसात तातडीने रब्बी पीक विम्यापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा होणार असल्याचे कळविण्यात आले. उस्मानाबाद ...
पुढे वाचा