शेतक-यांना रोख 50 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची धनंजय मुंडेंची मागणी

23 Nov 2018 , 09:19:05 PM

स्थगन प्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी व मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळ जाहीर होऊन २२ दिवस झाले पण अजूनही काहीच योजना जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. शेतकरी, मजुरांच्या हाताला काम देखील नाही. खरीपाचे पीक हातून गेले आहे. शेतक-यांना रोख 50 हजार रुपये , आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी मुंडेंनी विधान परीषदेत केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार आहे. आरक्षण प्रश्नी ४० जणांनी प्राण गमावले. त्याच बरोबर धनगर व मुस्लिम समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही, या मुद्द्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

संबंधित लेख