लातूर येथे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा - नवाब मलिक

22 Feb 2016 , 06:02:10 PM

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे शिवजयंतीला पोलिस स्थानकात घुसून पोलिस हवालदारांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी राष्टवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

शिवजयंतीला पानगावच्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंबेडकर चौकात झेंडे लावण्यास पोलिसांनी अटकाव केला होता. यामुळे संतप्त झालेल्या एका जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस हवालदार युनूस शेख जबर जखमी झाले तर आणखी एक हवालदार जखमी झाला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. राज्यामध्ये पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य अल्पसंख्यकांचे काय? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. 

सर्वसामान्य अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार, असा सवाल मलिक यांनी युती सरकारला विचारला आहे.


संबंधित लेख