राज्यसरकारकडून महाराष्ट्रात भगवीकरणाचे प्रयत्न - अजित पवार

23 Oct 2015 , 11:18:46 AM

पिंपरी-चिंचवड - लोकप्रतिनिधींची दिवसाढवळ्या हत्या होत असेल तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय ? मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शहराबरोबरच राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात फडणवीस यांना अपयश आले आहे. याची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस यांनी घेतली पाहिजे. टेकवडे यांची करण्यात आलेली हत्या ही निंदनीय घटना आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण स्वत: पुणे शहर पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे.

राज्यसरकारकडून महाराष्ट्रात भगवीकरणाचे प्रयत्न
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात दाभोलकर आणि पानसरे यांच्या सारख्या समाजसुधारकांचा झालेला खून व त्यांचे मारेकरी शोधण्यात राज्यसरकारला आलेले अपयश या दोन्ही गोष्टी संशयीत आहे. राज्यात युती सरकार आल्यापासून भगवीकरणाचे उदात्तीकरण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून एकंदरीत राज्यशासनाचा या भगवीकरणाला प्रोत्साहन असल्याचा संशय घ्यायला जागा आहे.

सरकारची अवस्था नाचता येईना अगंण वाकडं...
नाचता येईना अगंण वाकडं... ही म्हण सरकारसाठी तंतोतंत लागू पडत आहे. एकीकडे ते काय म्हणतात, 'आम्ही तिजोरी सगळी खाली करू' आणि दुसरीकडे म्हणतात, 'आधीच्या सरकारमुळं तिजोरी मोकळीच आहे. मग मोकळी तिजोरी खाली कशी करणार ? दोन्ही बाजूणं कसं काय बोलू शकतात ?
यांनी टोल आणि एलबीटी बंद करण्यासाठी तरतूद केली. पण राज्यावर दुष्काळाचे सावट असताना लोकांना वाचवण्यासाठी निधी द्यायचा सोडून एलबीटी माफ करत बसले आहेत. एलबीटी एप्रिलमध्येही बंद करता आला असता. आज महत्त्वाच काय ? एलबीटी, टोल बंद करणं की बळीराजा अक्षरशः पिचलेला आहे. आत्महत्या करत आहे. त्यांना वाचवणं ? त्यांना आधार देण्याची खरी गरज आहे. याकरिता संपूर्ण राज्याची यंत्रणा कामाला लावली पाहिजे.

संबंधित लेख