राष्ट्रवादीचा दुष्काळी भागाला टँकरने पाणीपुरवठा

29 Feb 2016 , 06:03:46 PM

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी भागात काम करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पक्षकार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या भागातील लोकांना पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे.

या उपक्रमाची सुरूवात सातारा जिल्ह्यापासून रविवारी करण्यात आली. साताऱ्यातील कोरेगाव-खटाव येथील दुष्काळग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता प्रशासनावर अवलंबून न राहता मागेल त्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना सरकारी मदतीविना उपक्रम राबवता येऊ शकतात याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात येत आहे.

संबंधित लेख