सिंधुदुर्ग प्रकरणावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत टीकेची झोड

11 Mar 2016 , 08:43:07 PM


सिंधुदुर्गात लोकप्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. लोकांनी लाखो मतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी मारहाण करणे हा विरोधी पक्षातल्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

आंदोलनांना असे दाबले जाणार असल्यास विरोधी पक्षांनी आता आंदोलने करायचीच नाहीत का, लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जात नसेल तर आम्ही सभागृहात का यायचे, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. लोकप्रतिनिधींचा सन्मान न राखणाऱ्या एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे मुंडे म्हणाले.

सिंधुदुर्ग प्रकरणात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होत आहे. या चौकशीमध्ये लोकप्रतिनिधीही असायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांनी विधानपरिषदेत व्यक्त केले.

संबंधित लेख