मोटर सायकल रॅली काढून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला भय्याजी जोशी यांच्या विधानाचा निषेध

04 Apr 2016 , 03:56:40 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये तिरंग्याऐवजी भगवा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारावा, तसेच ‘जन गन मन’ हे राष्ट्रगीत नसावे असे धक्कादायक विधान केले. या विधानाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे.

आज ठाणे शहरात मोटर सायकल रॅली काढून भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध ऩोंदवण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले. या रॅलीमध्ये तरुणांनी अभिमानाने तिरंगे फडकावले.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील उपस्थित होते. ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पवारही यावेळी उपस्थित होते. या रॅलीला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित लेख