राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत कोपर्डी, अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर आवाज उठविला. संसदेच्या शून्य काल प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने तिचा खून करण्यात आला ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे असे त्या म्हणाल्या. दोन दिवस मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली ही खेदाची बाब असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.दिल्लीत घडलेल्या ...
पुढे वाचाकोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयासमोर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी राज्यात अनेक प्रकरणे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब लक्षात घेता कोपर्डी प्रकरणाचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ६ महिन्यांच्या आत निकाल लागावा, यासाठी नवीन कायदा करावा लागला तरी सरकारने तो करावा. यासाठी आवश्यकता असल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी. आरोप ...
पुढे वाचाविधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहातील सर्व कामकाज बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कामकाज बाजूला ठेवून याबाबत चर्चा करावी ही विरोधकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. कोपर्डी गावातील 300 मुलींनी भीतीमुळे शाळेत जाणे बंद केले आहे. राज्यात सर्वत्र भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. ते शांत करण्यासाठी व योग्य संदेश जाण्यासाठी चर्चा होणे गरजेचे ...
पुढे वाचा