मुख्यमंत्री १0 वेळा आले तरीही बारामती राष्ट्रवादीचीच - धनंजय मुंडे

15 Dec 2016 , 07:05:26 PM

'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली असूनमहागाईचा आगडोंब या सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी बारामती नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ रविवारी बारामती शहरातील विद्यानगरी परिसरात आयोजित प्रचारसभेत बोलताना केला.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, मला संपवविण्याचे प्रयत्न सुरू असताना शरद पवार व अजितदादांनी माझ्यातील गुणांची पारख करून भटक्या समाजात जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांचा साडेतीन हजार कोटींचा घोटाळा उघड झाला असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही मुंडे यांनी या वेळी केला.

 

मुंडे म्हणालेनगरपालिकेची निवडणूक ही गल्लीतील निवडणूक असते. या निवडणुकीत गल्लीतील विकासाच्या धोरणावर चर्चा व्हायला हवी. मात्र,मुख्यमंत्री बारामतीत येऊन दिल्लीच्या धोरणावर बोललेही हास्यास्पद बाब आहे. जसे ते बारामतीत आलेतसे परळीतही आले होतेतरीदेखील परळीतील जनता राष्ट्रवादीच्याच पाठीशी राहिली. भ्रष्टाचारावरून रान उठवून भाजप सरकार सत्तेवर आले. मात्रया दोन वषार्ंत या सरकारमधील ११ मंत्र्यांनी साडेतीन हजार कोटींचे घोटाळे केलेते आपण पुराव्यानिशी सभागृहात सादर करूनही मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीतअसा आरोप मुंडे यांनी केला.

नगरपालिकेची निवडणूक ही गल्लीतील निवडणूक असतेअशा या गल्लीतील निवडणुकीत गल्लीच्या विकासाबाबतच चर्चा व्हायला हवी. मात्र,मुख्यमंत्र्यांनी बारामतीत येऊन दिल्लीच्या धोरणावर बोलणे हे मोठे दुर्दैव आहे. बारामतीत ते एकदा नव्हेतर दहावेळा जरी आले तरी कोणताही फरक पडणार नाही. बारामतीची अस्मिता असणार्‍या या निवडणुकीत राष्ट्रवादीला ऐतिहासिक विजय मिळेलअसा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख