विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार - सुनिल तटकरे

11 Dec 2015 , 04:35:28 PM

विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी निवडून द्यायच्या आठ जागांपैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार आहे. या सात जागांपैकी मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नागपूर या ४ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे तर सोलापूर, अमहदनगर, बुलडाणा या ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन जागांपैकी सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विद्यमान आमदार दिपक साळुंखे-पाटील व अहमदनगर मधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी उद्या जाहीर करण्यात येईल. मुंबईतील दोनपैकी एका जागेवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.

संबंधित लेख