केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणांचा पाऊस - जयंत पाटील

02 Feb 2017 , 12:24:06 AM


केंद्रसरकारचा २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अरुण जेटली  यांनी सादर केला. या अर्थसंकल्पातील प्रामाणिक लोकांना मदत करण्याच्या तसेच करात सवलत देण्याच्या भूमिकेचे स्वागत करतानाच या अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याची टिप्पणी राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी केली. हा अर्थसंकल्प जास्तच आशावादी असून त्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम विचारात घेतलेला नाही, देशात येणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर मर्यादा येणार आहेत, तसेच या वर्षात महसूल वाढण्याची शक्यता नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत, त्याचप्रमाणे शेतकरी व महिलांसाठीही विशेष तरतूदी नाहीत, हे पाटील यांनी निदर्शनास आणले. कौशल्य विकासाच्या योजना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळापासून असून आता फक्त नावं बदलण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले.

संबंधित लेख