राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडले गेले आहेत. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांशी एक नाळ जोडली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'महाविद्यालय तिथे शाखा' हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस हा ८० लाख विद्यार्थ्यांशी बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष बनला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मैदानात उतरली. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक लढ्यात विद्यार्थ्यांना साथ देत त्यांची वज्रमुठ आणखी बळकट केली. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यभरातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवल्या गेल्या होत्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सर्व विभागीय समाजकल्याण कार्यालयांवर मोर्चे काढून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रलंबित शिष्यावृत्ती मिळवून दिल्या. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ पाहणाऱ्या नीटची परीक्षा देणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थोडा दिलासा मिळाला. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विद्यार्थ्यांचे एक विश्वासाचे नाते तयार झाले आहे. विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आशेने पाहत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा देशाच्या इतिहासातील रेल्वे आणि अर्थ एकत्रितपणे मांडलेला पहिला अर्थसंकल्प होता. त्यामुळे यामध्ये काही नाविन्य असेल अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुर्दैवाने कोणत्याच गोष्टींचा खुलासा झाला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा देशातील जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी आज फेसबुकवर जनतेशी लाईव्ह संवाद साधताना व्यक्त केली. आज पाटील यांनी अर्थसंकल्पाबाबतचे प्रश्न, मुंब ...
पुढे वाचाराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी सर्वप्रथम नंदूरबार जिल्ह्याला भेट दिली. कुपोषण हा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांपैकी एक मोठा प्रश्न असून कुपोषण रोखण्याकरिता बनवलेली योजनाच कुपोषणग्रस्त झालेली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यातील अशा प्रत्येक कुपोषणग्रस्त जिल्ह्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवण्याचे काम यापुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष करणा ...
पुढे वाचादेशात येऊ घातलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थातच जीएसटी कायद्यामुळे करप्रणाली सुरळीत होईल, मात्र सामान करप्रणाली लागू झाल्याने देशातील गरीब जनतेलाही अप्रत्यक्षपणे कर द्यावा लागणार असून यातून महागाई वाढण्याची भीती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज भरविण्यात आले. यावेळी विधानसभेत झालेल्या चर्चेत पवार बोलत होते. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यांना निधी कमी पडल्यास केंद्र सरकार राज्यां ...
पुढे वाचा