खा.सुप्रिया सुळे यांच्या ठाणे येथील प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद

17 Feb 2017 , 08:04:32 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ठाण्यात प्रचार दौरा आयोजित केला गेला होता. या प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या प्रचार दौऱ्यात तरुण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाण्याचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद पंराजपे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार हेमंत टकले, आमदार  निरजंन डावखरे आणि युवती मुंबई अध्यक्ष अदिती उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे या कोपरी व बाळकुंभ या परिसरातील रोड शोमध्ये सहभागी झाल्या, तसेच त्यांनी प्रभाग क्र. ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व आरपीआय (ग) या महाआघाडीच्या उमेदवारांच्या खोपट येथील प्रचार कार्यालयास भेट दिली. अरुणा पेडणेकर, सारिका यादव, यानबा पाटील, रुपेश बिदियारे यांच्या प्रचारफेरीत सहभागी यावेळी सुप्रियाताई झाल्या. सुळे यांनी ठाणे मनपातील भाजप-सेनेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. शिवसेना-भाजप यांनी गेल्या २५ वर्षात फक्त भ्रष्टाचार केला असून ठाण्यात तिळमात्र विकास झाला नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला ठाण्यात परिवर्तन करायचे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये ठाण्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.


संबंधित लेख