राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी साधला पुणे, पिंपरी चिंचवड येथील महिलांशी संवाद

11 Dec 2015 , 08:41:17 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुणे शहर व पुणे ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांची भेट घेतली. आदरणीय शरद पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

५०% आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याचा ही आढावा घेण्यात आला. यावेळी माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर चंचला कोद्रे , शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष वैशाली नागवडे,युवती संघटिका अर्चना घारे व इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या बैठकीतही चित्राताईंनी अनेक विषयांवर महिलांशी संवाद साधला. पक्ष बांधणी योग्य पद्धतीने होण्यासाठी पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना पक्ष संघटने मध्ये जबाबदारी देणे आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच पक्षाला बळकटी येईल असे त्या म्हणाल्या

संबंधित लेख