देशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – खा. धनंजय महाडिक

18 Mar 2017 , 08:29:43 PM

देशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार  धनंजय महाडिक यांनी लोकसभेत देशाच्या शेतीविषयक धोरणाचा पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका मांडली. अन्नदाता शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यानं आत्महत्या करतो आहे, ही शरमेची बाब असून, शेतकऱ्याला सबसिडी देण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव आणि शंभर टक्के पीक विमा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या सबलीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण सूचना त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केल्या. 

संबंधित लेख