एलौरी गावाच्या संघर्षाची संघर्षयात्रेकडून दखल

03 Apr 2017 , 06:49:26 PM

संघर्षयात्रेच्या आजच्या पाचव्या दिवशी विरोक्षी पक्षांच्या सदस्यांनी लातूरच्या औसा तालुक्यातील एलौरी या गावी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे अनेकांचं नुकसान झालं, अनेकजण जखमी झाले होते. विरोधी पक्षातील सदस्यांनी या गावाला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला तसेच गावाला मदत म्हणून काही रक्कमही यावेळी दिली. आशा आहे की सरकारदरबारी या गावकऱ्यांची व्यथा ऐकली जाईल. 

संबंधित लेख