शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत केंद्र व राज्य सरकारमध्ये नाही – अजित पवार

12 Apr 2017 , 08:54:34 PM

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, तसेच उपसभापतींचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडला. यावेळी उपस्थितांसमोर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना पाण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पाण्याचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचे ते म्हणाले. शेतकरी बांधव आधीच अडचणीत आहेत. त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी आम्ही कर्जमाफीची मागणी करत आहोत, मात्र सरकार त्यावरही सरकार निर्णय घेत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच सरकार उद्योगपतींची थकीत कर्जे भरते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २० हजार कोटींची कर्जमाफी देण्याची दानत केंद्र व राज्य सरकारमध्ये नाही, असा आरोप पवार यांनी यावेळी बोलताना केला.

संबंधित लेख