राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ...
पुढे वाचासंघर्षयात्रेच्या धुळे येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, तुरीला भाव घोषित करत सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, बारदाने खरेदी झाली नाही म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दलाली वाढवली आहे, त्यामुळे हे सरकार म्हणजे फेकू सरकार असल्याची टीका केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, भाई जगताप, प्रकाश गजभिये, अबू अझमी, प्रा. कवाडे, राहुल बोंद्रे, ...
पुढे वाचालोकसभा निवडणुकांच्या काळात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जात असत तिथे अच्छे दिन आऐंगे असे अश्वासन देत असत. आता पंतप्रधानांच्या याच वक्तव्याची गावोगावी खिल्ली उडवली जाते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. संघर्षयात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील उजनी येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपने मोठमोठी आश्वासने शेतकऱ्यांना दिली मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पंतप्रधानांनी आणि राज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली, असा आरोप मुंडे यांनी केला. यावेळ ...
पुढे वाचा