विरोधकांची शेतकरी कर्जमाफीसाठीची संघर्षयात्रा आज पुण्यात पोहोचली असून विरोधी पक्षातील सदस्यांनी फुले वाड्याला भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोधकांना आसूड भेट दिला. हाच आसूड शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात वापरा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...
पुढे वाचासत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हावं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा अशी मागणी आम्ही प्रत्येक अधिवेशनात करतो, मात्र सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही ही संघर्षयात्रा काढली असून शेतकऱ्यांसाठी आम्ही आणखी तीव्र संघर्ष करू,असा इशारा तटकरे यांनी दिली. संघर्षयात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ ...
पुढे वाचाविरोधी पक्षांची संयुक्त संघर्षयात्रा सोमवार दि. १७ एप्रिल रोजी नाशिकपर्यंतचा पल्ला गाठणार आहे. सोमवारी मालेगाव, नामपूर, सटाणा, देवळा, चांदवड, पिंपळगांव बसवत, आडगांव येथे संघर्षयात्रेचा दौरा असून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. संघर्षयात्रेला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने संघर्षयात्रेला पाठिंबा देतील याची खात्री विरोधकांना आहे. ...
पुढे वाचा