संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान चिखली येथे विरोधी पक्षातील सदस्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसमावेत भोजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची तसेच लहान मुलांची आस्थेने विचारपूस केली. या महिलांना साडीवाटपही यावेळी करण्यात आले. ...
पुढे वाचाविरोधी पक्षांची संयुक्त संघर्षयात्रा सोमवार दि. १७ एप्रिल रोजी नाशिकपर्यंतचा पल्ला गाठणार आहे. सोमवारी मालेगाव, नामपूर, सटाणा, देवळा, चांदवड, पिंपळगांव बसवत, आडगांव येथे संघर्षयात्रेचा दौरा असून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. संघर्षयात्रेला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने संघर्षयात्रेला पाठिंबा देतील याची खात्री विरोधकांना आहे. ...
पुढे वाचाविरोधकांची शेतकरी कर्जमाफीसाठीची संघर्षयात्रा आज पुण्यात पोहोचली असून विरोधी पक्षातील सदस्यांनी फुले वाड्याला भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोधकांना आसूड भेट दिला. हाच आसूड शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात वापरा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...
पुढे वाचा