शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या विरोधात चक्का जाम आंदोलन

27 Apr 2017 , 12:27:08 AM

शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या विरोधात राज्यभरातील शेतकरी आज एकवटले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज एकत्र येऊन शहापूर येथे चक्का जाम आंदोलन करत स्वतःला अटक करवून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या या लढ्याला आधीच पाठिंबा जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, माजी आमदार गोटीराम पवार यांनीही शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. या नेत्यांनाही यावेळी अटक करण्यात आली.

संघर्षयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा समारोप १८ एप्रिल रोजी शहापूर येथे झाला होता. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २६ एप्रिल रोजी चक्का जाम करत जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन सर्व शेतकऱ्यांना केले होते. त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी तसेच असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

संबंधित लेख