अहमदनगरमध्ये अरुण जगताप विधान परिषदेवर

31 Dec 2015 , 09:46:04 AM

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सात जागांचे निकाल जाहीर झाले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या अरुण जगताप यांनी २४४ मतांसह विजय मिळवला. शिवसेनेच्या शशिकांत गाडे यांचा जगताप यांनी ६७ मतांनी पराभव केला. जगताप यांना २४४ तर शशीकांत गाडे यांना १७७ मते मिळाली. सोलापूर, अमहदनगर, बुलडाणा या ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती. या तीन जागांपैकी सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विद्यमान आमदार दिपक साळुंखे-पाटील व अहमदनगर मधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला होता.

संबंधित लेख