राष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा राज्यभरात निषेध

12 May 2017 , 06:57:02 PM

शेतकऱ्यांना शिवराळ भाषेत संबोधणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन व जोडे मारत राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. परभणी, पंढरपूर आणि अहमदनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात युवक जिल्हाध्यक्ष शांतिस्वरूप जाधव,विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, विद्यार्थी शहाराध्यक्ष सुमंत वाघ, इम्रान लाला बाबा देशमुख यांची उपस्थिती होती. पंढरपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत धवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तर अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, सारंग पंधाडे, काज़िम शेख, प्रकाश भागानगरे, गुड्डू खताळ, बाबासाहेब गाडळकर, किरण पंधाडे, ऋषि ताठे, अमित भूतकर, नितिन लिगडे, राहुल ठोंबरे, शुभम टाक, संजय खताडे, राहुल सांगळे, अमर पठारे, भाऊ सुपेकर, सोमनाथ तांबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख