कांद्याला एक रुपया अनुदान देणाऱ्या सरकारच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का? शेतकरी जमातीचा माणूस सत्तेत नसल्याने काय होतं ते गेल्या तीन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. आज शेतकरी अडचणीत असताना कोणीच त्याच्या मदतीला धावून जात नाही, शेतकरी नेते सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री झाल्यानंतर कुठे आहेत? त्यांना आता सत्तेची हवा लागली, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सटाणा येथे केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संघर्षयात्रेच्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत् ...
पुढे वाचाशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल. ...
पुढे वाचासंघर्षयात्रेदरम्यान विरोधकांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेटशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पळसगाव येथून सुरुवात झाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पळसगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. बंडू करकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बंडू करकाडे यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आठवड्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव ...
पुढे वाचा