अजित पवार यांनी नांदेड येथे केले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

27 Jun 2017 , 06:26:44 PM

मराठवाडा दौऱ्यादरम्यान नांदेड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले.
संघर्षयात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना जागं करण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना ही जाणीव झाली की हे सरकार शेतकरीद्रोही आहे. याआधीही शेतकरी अडचणीत होता त्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफीची घोषणा करून त्यांना दिलासा देण्याचं काम केलं होतं. आजही तशी गरज होती म्हणून शेतकरी पेटून उठला आणि कर्जमाफीची घोषणा झाली. आता आपल्याला आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करायचे आहे. कोणाला काही तक्रार असेल तर थेट मला किंवा प्रांताध्यक्षांना सांगावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नांदेड शहरातील अनेक विकास कामांसाठी निधी दिला. हे सरकार फसवं निघालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे सत्य लोकांसमोर आणावं. दर महिन्याला जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका व्हायला हव्यात. फक्त पदं घेऊन गप्प बसणे चालणार नाही. दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडायला हव्यात. नांदेडमध्ये अचानक एम आय एम उदयास आली आहे. भडकाऊ वक्तव्य करून तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम एम आय एम करत आहे. एम आय एम भाजपच्या सांगण्यावरून चालतं की काय असा संशय येतो. या सर्व धर्मांध ताकदींचा आपल्याला पराभव करावा लागेल. शिवसेनेचा शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नाही. पण आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न शिवसेना करते. यांना आपल्याला रोखायला हवं. काही जण फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात अशा व्यक्तींना बाजूला करून पक्ष संघटना मजबूत करावी.

संबंधित लेख