वेगवेगळ्या क्षेत्रातील कमवलेले मित्र हीच शरद पवार यांची खरी संपत्ती - प्रताप पवार

07 Jan 2016 , 05:33:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शरद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सिंहगड महाविद्यालय, पुणे येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि प्रा.एम.एन.नवले होते. 

आदरणीय शरद पवार यांचे बंधु तथा सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार म्हणाले की, "माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दित मला एकदाही साहेबांचा बातम्यांसाठी फोन आला नाही. विरोधातल्या बातम्या किंवा इतर तपशील अमुक पद्धतीने छापा, असा सल्लाही त्यांनी कधीच दिला नाही. कुटुंब प्रमुख म्हणूनही ते आपली भूमिका चोख बजावतात. कुटुंबातील सर्व सदस्यांकडे त्यांचे लक्ष असते. सर्वांची आस्थेने चौकशी करत असतात. त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र कमवले, हीच त्यांची खरी संपत्ती आहे. त्यांना लाभलेली स्मरणशक्ती ही दैवी देणगी आहे."

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेस पुण्यातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

संबंधित लेख