सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीत साधला संवाद

28 Jun 2017 , 06:42:55 PM

अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संवाद साधला. अमरावती येथे आयएमए, निमा, आयएसएम, इंजिनीअरिंग असोसिएशन, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून होत असलेल्या त्रासाबद्दलचे निवेदन सादर केले.

याप्रसंगी मा. अरूणभाई गुजराथी, मा.हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख,सुरेखाताई ठाकरे, चित्रा वाघ, वसंतराव भुईखेडकर, सुनील वऱ्हाडे, बाबा ठाकूर, संगीता ठाकरे, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख