भाजपा मधील सावकारांना सहकारात घुसविण्यासाठीच सहकारी संस्था अधिनियमात बदल - नवाब मलिक

07 Jan 2016 , 07:37:46 PM


लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार यशस्वी होऊ शकत नाही.परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे भाजपा सरकारने आध्यादेशाच्या माध्यमातून सहकारी अधिनियमात बदल करून आपल्या मर्जीतील लोकांना सहकारात घुसवण्याचा डाव रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

५  जानेवारी २०१५ रोजी राज्य सरकारने सहकारी बँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याबाबत आध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२/२०१५ हा आणखी एक आध्यादेश काढलेला आहे. पहिल्या आध्यादेशात जिथे सरकारी भागभांडवल आहे. तिथे सरकारच्या वतीने २-२ अशासकीय सदस्य नेमण्याचा आध्यादेश काढलेला आहे. त्यानंतर ८ तारखेला नवीन आध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही आध्यादेश काढण्यामागे या सरकारचा इतकाच उद्देश आहे की राज्यात सहकार क्षेत्रात भाजप-सेनेला स्थान नाही. या दोन आध्यादेशाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोडीत काढणे अथवा या  माध्यमातून आपली माणसे सहकार क्षेत्रात घुसविणे, त्या साठीच सहकारी अधिनियमात बदल करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

१२ जानेवारी २०१२ रोजी या देशात सहकार संस्था संदर्भातील घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राला अधिक लोकतांत्रिक स्वरुप दिले पाहिजे असा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. लोकतांत्रिक पद्धतीने निवडून न येणाऱ्या लोकांना सहकारात घुसविण्याचा निर्णय कुठेतरी लोकतांत्रिक व्यवस्थेला मारक आहे.

दुसरा जो नवीन घटनादुरुस्ती आहे. त्यामध्ये जर एखाद्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले तर सर्व संचालक निवडणुकीस अपात्र ठरणार आहेत. यामध्ये गैरकारभाला विरोध करणारे संचालक देखील निवडणुकीस अपात्र ठरणार आहेत. यामुळे सहकारातील लोकतांत्रिक व्यवस्थेला धक्का लागणार याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत.

श्रीपाल सबनीसांना धमकी देणा-या संजीव पुनाळेकरांवर कारवाई करा. - नवाब मलिक

साहित्यिक श्रीपाल सबनीस यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रीपाल सबनीस तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला’, असं उपरोधिक ट्विट करुन धमकी देणाऱ्या सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नवाब मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

संबंधित लेख