'गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा' कार्यक्रमास २२ जुलैपासून सुरुवात

07 Jul 2017 , 05:38:16 PM

सातारा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संबोधित केले. तसेच, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत २२ जुलैपासून 'गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा' हा कार्यक्रम पक्षातर्फे राबवला जाणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवला जाणार असून पुढील महिनाभर तो सुरू राहिल.

तसेच, १३ तारखेला कोपर्डी हत्याकांडाला १ वर्ष पूर्ण होईल मात्र अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल अशी ग्वाही सरकारने दिली होती मात्र अद्याप काही हालचाली झाल्या नाहीत, त्यामुळे या गोष्टीचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यभरात मूक निदर्शने करण्यात येणार आहेत, हेही जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका ही लोकांच्या बाजूने आहे. थेट सरपंच निवडला तर वेगवेगळ्या विचारांचे लोक तिथे बसतील याने गावाचा विकास होणार नाही. या सरकारने कर्जमाफी केली मात्र अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला संघर्ष चालूच ठेवेल असा इशारा सरकारने समजावा. कार्यकर्त्यांनी अशी ताकद पक्षाच्या पाठिशी उभी करावी की कोणतीही लाट आपल्याला रोखू शकणार नाही. निवडणूका २०१९ला लागल्या काय मध्यावधी लागली काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्णपणे तयार राहील.

संबंधित लेख