मंजुळा शेट्ये प्रकरणी काय करत आहेत रणजित पाटील आणि मुख्यमंत्री? – चित्रा वाघ

08 Jul 2017 , 06:50:35 PM

पिंपरी-चिंचवड शहरात आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. मंजुळा शेटये हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. काय करत आहे रणजित पाटील, काय करतायत मुख्यमंत्री ? रणजित पाटलांचे वडील तर निष्पाप कर्मचाऱ्यांना मारत फिरत आहे. आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. गृहमंत्र्यांच्या वडिलांसाठी वेगळा न्याय आहे का? सरकार काय झोपलं आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप काही केलं. काही लोकांनी खोट्या वल्गना करून सत्ता हाती घेतली आणि अवघ्या काही महिन्यात यांचं पितळ उघडे पडले. सगळ्या गोष्टीत हे सत्ताधारी फेल ठरले आहेत, असे म्हणत सरकारवर टीका केली.

यावेळी भाजपचे राजेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांसह व काँग्रेसचे विवेक विधाते व नानासाहेब कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,आ. स्मिता पाटील, जयदेव गायकवाड, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मनपा विरोधी पक्षनेते योगेश बहल, सारंग पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख