सर्व स्तरातून लोकांनी सामाजिक कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे- अजित पवार

09 Jan 2016 , 06:05:09 PM

बारामती येथील वृद्धाश्रमाची नवीन वास्तू बाधंण्यासाठी मुबंईचे रविद्र जैन व प्रितम राठोड यांनी सढळ हाताने मदत दिली. अजित पवार आणि सुनेत्रा पवार (अध्यक्षा, बारामती टेक्सटाईल्स पार्क) यांच्या हस्ते काल तांदुळवाडी येथील बारामती जेष्ठ नागरीक संघ, (वृद्धाश्रम) रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्या वाढीव १६ खोल्यांच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

या प्रसंगी अजित दादा म्हणाले, “तुम्ही आम्हाला संधी देता, त्यातून आम्ही कामे करतो. महाराष्ट्रात, पुणे आणि बारामती परीसरामध्ये चांगले काम झाले पाहिजे, हे उद्दिष्ट मनामध्ये ठेऊन आम्ही कामे करत असतो. केंद्र, राज्य किंवा जिल्हापरीषद असो, काहीवेळा निधी लवकर पोहचू शकत नाही. अशा वेळी सामाजिक कामांसाठी राठोड व जैन यांसारख्या दानशूर व्यक्तीची गरज लागते. समाजासाठी काहीतरी करावे असे राठोड व जैन यांना वाटले. ते मला म्हणाले कि, आम्ही विद्यार्थी दत्तक घेतो. त्यांचा शिक्षणाचा खर्च आम्ही करतो. मी म्हटले, आम्ही पवार चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत आणि विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत मदत करीत असतोच. मदत करायचीच असेल तर वृध्दांना जागा कमी पडत आहे. तिथे मदत करावी. त्यांना माझी सूचना पटली आणि त्यांनी होकार दिला. आज राठोड व जैन यांच्या धाडसी कार्याचे खरेच कौतुक वाटते.”
“एन्व्हॅमेंन्टल फोरम ऑफ बारामती चे सदस्य बारामती परीसरात ओढा खोलीकरण व सरळीकरण कामे प्रकल्प मेघदूत अंतर्गत करीत आहे या त्यांच्या ओढा खोलीकरण व रूंदीकरणामुळे अनेक गावांत लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे,” असेही अजितदादांनी सांगितले. 

या वेळी ‘लायन्स क्लब, बारामती’ तर्फे वृद्धाश्रमाला गरम पाण्याचे मोठे बंब देण्यात आले. क्लबचे अध्यक्ष राजेंद्र यादव, मिलिंद शहा आणि सुरेंद्र भोईटे यांचाही अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख