उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, धनंजय मुंडे यांची मागणी

05 Aug 2017 , 06:43:33 PM

औद्योगिक विकासासासाठी (एमआयडीसीसाठी) करण्यात येणाऱ्या जमीन संपादनात मोठा घोटाळा झाला असून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.

गोंदेदुमाला, ता.इगतपुरी, जि.नाशिक येथील अधिसुचित जमिनीपैकी काही क्षेत्र उद्योजकांच्या लाभासाठी वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील आठवड्याच्या कामकाजात सविस्र माहिती सभागृहात पुराव्यांसह सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंडे यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडून केली.

संबंधित लेख