जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले विद्यापीठाला कुलूप

10 Aug 2017 , 06:49:42 PM

मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या गेटला कुलूप ठोकले. निकालांची दुसरी डेडलाईनही उलटून गेल्यामुळे आव्हाडांनी हे प्रतिकात्मक पाऊल उचलून विद्यापीठाचा निषेध नोंदवला आहे. डेडलाईन पर्यंत निकाल न लागल्यास विद्यापीठाच्या गेटला टाले ठोकू, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी आधीच व्यक्त होती. 

अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी निकाल आणि गुणपत्रिकेची आवश्यकता असते. मात्र ऑगस्टचा पहिला आठवडा आला, तरी सर्व परीक्षांचे निकाल न लागल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या वतीने आव्हाडांनी संताप व्यक्त केला.

संबंधित लेख