राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबईच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या गेटला टाळे

31 Aug 2017 , 06:16:08 PM

सहाव्या सेमिस्टरचे निकाल लावण्यात दिरंगाई करणा-या मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जी कारभाराचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबईच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या गेटला टाळे लावत आंदोलन करण्यात आले. संतप्त विद्यार्थी व पालकांनी या आंदोलनात सहभागी होत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुहैल सूबेदार, मुंबई अध्यक्ष अ. वि.; दिपक पवार, मुंबई अध्यक्ष सेवादल; पुजा गुप्ता, युवती जिल्हाध्यक्षा; अॅड. मनोज टपाल, मंगेश शेवाळे, हार्दिक जाधव, आरीज सकारीया, भिमन्ना मेटी, शुभम तावडे, अर्चित मिश्रा, शीरीष सिंह हे उपस्थित होते.

संबंधित लेख