म्हणून पवार साहेबांनी पुणे वेधशाळेचे तोंड गोड केले...

01 Sep 2017 , 09:41:06 PM

राज्यात समाधानधारक पाऊस होईल असा अंदाज काही दिवसांपूर्वी पुणे वेधशाळेने दिला होता. हा अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपरोधाने म्हणाले होते. पण पुणे वेधशाळेचा अंदाज खरा ठरला. त्यामुळे बोलल्याप्रमाणे बारामतीवरुन १०० किलो साखर राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी वेधशाळेतील अधिकाऱ्यांना भेट दिली. ही साखर वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारली असून राज्यात पुढेही समाधानकारक पाऊस बरसणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असल्याचे काकडे यांनी सांगितले.

संबंधित लेख