तासगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, आ. सुमनताई पाटील यांची मागणी

02 Sep 2017 , 06:58:13 PM

तासगांव (सांगली) तालुक्यातील सर्व पाणी योजना सुरु कराव्यात, तासगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावणी सुरु करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा विविध मागण्यांसाठी तासगांव कवठेमहकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सुमनताई पाटील यांनी केली. तसेच आज स्वर्गीय आबा असते तर त्यांनी या मागण्यांसाठी सरकारला सळो की पळो केले असते असे वक्तव्य त्यांनी केले.

या मोर्चात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता आर आर पाटील, सुरेश भाऊ पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन शंकरराव दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, ताजुद्दीन तांबोळी, राजेश पाटील तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख