स्वतः पालकमंत्र्यांना बुजवावे लागले खड्डे!

02 Sep 2017 , 08:41:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट

संपूर्ण ठाणे शहर खड्डेमय झाले असताना याविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली आणि खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम करावे लागले. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रशासनाचे आभार मानले. पालकमंत्र्यांना स्वतः खड्डे बुजवण्याकरिता यावे लागते याचा अर्थ सरकारची प्रशासनावर पकड नाही असे दिसून येते अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित लेख