विचार विनिमय करून सरकारने तिहेरी तलाकबाबत कायदा करावा – नवाब मलिक

04 Sep 2017 , 06:06:09 PM

‘तिहेरी तलाक’ बाबत निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर कायदा बनवण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने सर्वांना विचारात घेऊन, विचार विनिमय करून याबाबत कायदा बनवावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. सर्व धर्मांमध्ये घटस्फोटाची तरतूद आहे. इस्लाम धर्मातील तलाक पद्धतीची नियमावली लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख