पाच हजार शाखांचे उद्घाटन करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मानस – संग्राम कोते पाटील

09 Sep 2017 , 07:17:02 PM

नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या १९ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसापासून 'गाव तिथे शाखा' हा उपक्रम राबवला जात आहे. यावेळी संग्राम कोते पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत ५ हजार शाखांचं उद्घाटन करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान संग्राम कोते पाटील यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष विवेक वळसे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख