राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबईचे राज ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर

02 Oct 2017 , 10:54:19 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते मा. अजित पवार यांच्यावर त्यांच्या नेहमीच्या टिंगल-टवाळी करण्याच्या खोडीप्रमाणे उपहासात्मक टीका केली. परंतु, राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई ने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. अजित पवार कधी हसतात का, असा प्रश्न ठाकरे यांना पडला असल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबईच्या वतीने दादांच्या हसऱ्या फोटोजचा अल्बम बनवून त्यासोबत ठाकरे यांना दादांच्या कामाची पद्धत व त्यांचा जनसंपर्क याचे वर्णन करणारे तसेच निवडणूक न लढता, लोकांमध्ये न मिसळता घरात बसून आदेश सोडायचे व लोकांच्या नकला करायच्या हे नेत्याचे लक्षण नाही, अशा आशयाचे पत्र पाठवण्यात आले. राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.

संबंधित लेख