सरकारविरुद्धच्या जनप्रक्षोभाला धनंजय मुंडे यांची साद

30 Oct 2017 , 10:58:32 PM

सरकारच्या तुघलकी कारभाराने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य हैराण झाला असून सरकारविरोधात राज्यभरात प्रचंड जनक्षोभ दिसून येत असतानाच विधान परिेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या जनप्रक्षोभास हुंकार देत बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज एल्गार पुकारला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात बीड जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरच्या शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना दुसरीकडे कर्जमाफीचा लॉलीपॉप दाखवत फडणवीस सरकार शेतकर्‍यांची घोर फसवणूक करत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. हे सरकार सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांचे नसून धनदांडग्यांचं असल्याचे उघड झाले आहे. आजच्या मोर्चात सर्वक्षेत्रातले लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी १ वाजता या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली होती.

संबंधित लेख