सर्वाधिक मित्रांचा गिनिज रेकॉर्ड काढायचा झाल्यास, तो पवार साहेबांच्या नावावर नोंदवला जाईल- अरुण फिरोदिया

13 Jan 2016 , 08:16:57 PM

आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शरद व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात कायनेटिक उद्योग समुहाचे अध्यक्ष यांनी उद्योगविश्वातील स्थित्यंतरांसदर्भातील पवार साहेबांच्या दृष्टीचे अनुभव सर्वांसमोर मांडले. 

उद्योगधंद्यांना पूरक धोरण शरद पवार यांनी नेहमी राबवले. त्यांचे काम सर्वसमावेशक असते. पुण्यातल्या आयसीसी टॉवरचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सत्तेत असताना पवार यीं उद्योगधंद्यांना कसे प्रोत्साहन दिले, विरोधी पक्षात असतानाही पवार साहेबांनी उद्योजकांन विधायक कामांसाठी कशी मदत केली, हे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले. 

जगभरातल्या ऑटो इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्रीमधील नवनव्या बदलांकडे पवार यांचे इतके सूक्ष्म लक्ष असते, की उद्योजकही थक्क होतात, असा अनुभव फिरोदिया यांनी सांगितला. 

जगातील सर्वात जास्त मित्र असल्याचा गिनिज रेकॉर्ड काढायचा झाल्यास, तो निश्चितच पवार साहेबांच्या नावावर नोंदवला जाईल, असेही फिरोदिया म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी यांच्या विद्यमान आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ए.आय.एस.एस.एम.एस. चे सेक्रेटरी मा. मालोजीराजे छत्रपती यांनी भूषवले, तर ए.आय.एस.एस.एम.एस. चे खजिनदार अजय पाटील आणि सहसचिव सुरेश शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्रचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी या व्याख्यानमालेचे संयोजन केले. 

संबंधित लेख