महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची #हल्लाबोल पदयात्रा नवव्या दिवशी खडकी
गावातून निघाली. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली. यावेळी खासदार
सुप्रिया सुळे यांनी गरीब शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, जीएसटी, नोटबंदी,
कर्जमाफी असे सगळे गंभीर विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
हल्लाबोल करत असल्याचे सांगतिले. तसेच १२ डिसेंबरला सरकारला जाब विचारण्यासाठी
जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.
सभेच्या ठिकाणी केळी बागायतदार गीताबाई झांडे, पंकज झांडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना
निवेदन दिले. त्या शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी मंत्री गुलाबराव देवकर,
आमदार राणा जगजीत सिन्हा पाटील, महिला
प्रदेशाध्यक्ष चित्रा
वाघ, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, आमदार विदया चव्हाण, आमदार
भाऊसाहेब पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, महिला जिल्हाध्यक्षा
शरयू वांदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, प्रवक्ते महेश
तपासे आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
नागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली. ...
पुढे वाचाआज हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वतयारीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची सर्व जिल्हा समन्वयकांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे व सोशल मीडिया प्रभारी आनंद परांजपे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कोणत्या पद्धतीने करता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली. ...
पुढे वाचाकळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.नरेंद्र मोदी यांच्या सर ...
पुढे वाचा