दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रु. प्रति लिटर अनुदान द्या : आ. अजित पवार

23 Dec 2017 , 06:47:48 PM

सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना किंमत देत नाही, दुधाला दर देण्याबाबत सरकार फक्त तारीख पे तारीख करत आहे. सरकारने २७ रूपये दर जाहीर करून देखील शेतकऱ्यांना २०, २२, रुपये असा दर दिला जातो. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील दुधसंघ बंद पडतील व खासगी कंपन्या तिथे पुढे येतील. शेतकऱ्यांच्या दुधाला आज जास्त दर देण्याची गरज आहे. पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते मग दुधाला कमी भाव का?, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी केला. याबाबत शासनाने लवकरात लवकर बैठक लावावी आणि नववर्षाची सुरुवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊन करावी. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे आपल्या राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख