स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५२८० शाळांची बत्ती गुल : आ. अनिल भोसले

23 Dec 2017 , 06:55:32 PM

एकीकडे डिजीटल इंडियाचा बागुलबुवा करणाऱ्या या सरकारला शिक्षणाचे आधुनिकीकरण सोडा, शाळांमध्ये साधा वीजपुरवठाही करता येत नाही. युडास (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५ हजार २८० शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याचे धक्कादायक वास्तव सांख्यिकी माहितीनुसार समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन राज्यातील शाळांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ५२८० शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याचे मान्य केले आहे. हे सरकारचे अपयश आहे. एका बाजूला सरकार पटसंख्येचे, मेरिटचे कारण देत राज्यात हजारो शाळा बंद पाडण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला ज्या शाळा सुरू आहेत त्यांना वीज पुरवली जात नाही, हे खेदजनक आहे.

संबंधित लेख